Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक : भाजप उमेदवार मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी

वडगाव नगरपंचायत निवडणूक : भाजप उमेदवार मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी

वडगाव | प्रतिनिधी – वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शनिवारी दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ दुपारी १२:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित राहणार असून, पारंपरिक पद्धतीनुसार प्रचाराचा नारळ फोडून प्रचार मोहीमेची सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.

पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे हा प्रचार शुभारंभ वडगावमध्ये भाजपच्या शक्तीप्रदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शहरातील विविध बूथांवर व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मृणाल म्हाळसकर या युवा व सक्रिय उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. स्वच्छ व पारदर्शक प्रशासन, नागरिककेंद्री निर्णय आणि विकासाला गती देणे हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शुभारंभ कार्यक्रमानंतर शहरातील प्रमुख भागांतून मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत घरगुती भेटी, लहान सभा, नागरिक संवाद कार्यक्रम आणि विभागनिहाय प्रचारयोजना राबविण्याची तयारी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!