तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
तळेगाव दाभाडे : महिलांच्या आरोग्य संवर्धनासह कुटुंब सुदृढ करण्याच्या उद्देशाने “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” या विशेष आरोग्य शिबिराचा शुभारंभ गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला.
शिबिराचा कालावधी
हे अभियान १९, २४, २५, ३० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जाणार असून, तळेगाव दाभाडे येथील मुख्य केंद्राबरोबरच आंबी, इंदोरी व निगडे या उपकेंद्रातही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
पहिल्या दिवशीचा लाभ
१८ सप्टेंबर रोजी झालेल्या शिबिरात एकूण १९२ लाभार्थ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले.
हृदयरोग व मधुमेह असलेल्या रुग्णांची रक्तदाब तपासणी तसेच प्रयोगशाळा तपासण्या घेऊन आवश्यक ते उपचार करण्यात आले.
गरोदर माता व स्तनदा माता यांच्या तपासण्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी केल्या. गरोदर मातांना लसीकरणासह रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात आल्या.मातांना निरोगी जीवनशैली, संतुलित आहार व पोषण याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, मेडिसिन व अस्थिरोग तज्ञ डॉक्टर यांनी तपासणी व उपचार सेवा दिली. तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमने विशेष सहकार्य केले.
आयोजन व मार्गदर्शन
हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डाॅ. मनोजकुमार चौधरी व डाॅ. दिनेश महालिंगे यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
पुढील शिबिरासाठी आवाहन
तळेगाव शहर व ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोजकुमार चौधरी यांनी केले आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. मो. ९९२१८०७०११



















