Homeमहत्त्वाचेतळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

तळेगाव दाभाडे : शहरातील सर्वच भागात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात उच्छाद मांडला आहे. अनेक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याच्या घटना घडल्या आहेत तर नाना भालेराव कॉलनी या ठिकाणी कुत्र्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे अक्षरशः दुर्गंधी पसरली आहे.

नाना भालेराव कॉलनी मध्ये रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत आहे हाच कचरा भटके कुत्रे सर्व कॉलनी भागात पसरवत आहेत. साधारणपणे सहा वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून कुत्र्यांची नसबंदी केली होती.

नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढली यासंदर्भात बोलताना तळेगावातील रहिवाशी गणेश भेगडे म्हणाले की पुणे मुंबई महामार्गावरील विजय मारुती खिंड या ठिकाणी पिंपरी चिंचवड भागातील एक वाहन रात्रीच्या वेळी येऊन भटकी कुत्रे सोडून जातात. त्यानंतर ही भटकी कुत्रे तळेगाव शहरात येतात त्यामुळे देखील तळेगाव दाभाडे शहरात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.

तरी नगरपरिषद प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पायी चालणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावत जातात कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीपासून सुटण्यासाठी वाहन पळवताना किंवा पळताना अपघात घडलेले आहे. रात्री अंधारात व सुनसान रस्त्यावर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात असून नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई होत नाही असे देखील अनेक नागरिकांनी सांगितले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!