Homeमहत्त्वाचेपुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : अलीकडील अतिवृष्टी आणि महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून सामाजिक बांधिलकी जपत एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

ही मदतीची धनादेशरूपाने रक्कम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते शासनाकडे सुपूर्त करण्यात आली. या वेळी फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. रेशमाताई अनिल भोसले, सचिव संतोष छबुराव भेगडे तसेच फेडरेशनचे मान्यवर संचालक उपस्थित होते.

फेडरेशनकडून सांगण्यात आले की, समाजातील प्रत्येक घटकासोबत संकटाच्या काळात उभे राहणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्याचा हेतू या मदतीमागे आहे.

अध्यक्षा रेशमाताई भोसले यांनी सांगितले की, “पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन ही केवळ आर्थिक संस्था नसून सामाजिक दायित्व जपणारी संघटना आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची परंपरा आहे.”

सचिव संतोष भेगडे यांनीही सांगितले की, “फेडरेशनने पूर्वीही नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य केले असून, पुढेही अशा सामाजिक कार्यात आघाडी घेण्याचा आमचा निर्धार आहे.”

या प्रसंगी उपस्थित संचालकांनी फेडरेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाजातील सर्व स्तरांनी हातभार लावावा, असे आवाहन केले.

(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!