इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने रचला इतिहास. पुणे जिल्हा ग्रामीण हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलय, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व माध्यमिक विद्यालय महोळबाचीवाडी, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून मावळ तालुक्याची मान उंचावली आहे.

या विजयानंतर इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरावर इतिहास रचला असून महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या मेहनतीमुळे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पुरस्कार वितरण समारंभात इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, आयोजन प्रमुख किरण पवार शाळेचे मुख्याध्यापक, तसेच इंदापूर तालुका क्रीडा अध्यक्ष आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

विभागीय स्तरावरील पुढील स्पर्धेसाठी एकूण आठ विभाग असणार असून पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधित्व इंद्रायणी ज्युनियर कॉलेज करणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्याध्यक्ष चंदकांत शेटे, तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी संघाचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य संदीप भोसलें, क्रीडा शिक्षक योगेश घोडके, गोरग काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















