Homeमहत्त्वाचेबकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

वडगाव मावळ दि. २७ : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी सायंकाळी वडगाव शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला असून शहरातील प्रमुख व संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी पायी संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली.

सदर रूट मार्च आज दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान घेण्यात आला. पंचायत समिती चौक, श्री पोटोबा महाराज मंदिर परिसर, जमा मशीद, ढोरेवाडा, मोरया चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिलिंद नगर चौक, कुडे वाडा, चावडी चौक, माळीनगर, केशवनगर तसेच विशाल लॉन्स परिसर अशा विविध भागांतून पोलिसांनी संचलन केले.

या रूट मार्चमध्ये १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस अंमलदार तसेच १० होमगार्ड जवान सहभागी झाले होते. पोलिसांच्या या संचलनामुळे शहरातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.

पोलीस प्रशासनाकडून सणाच्या काळात कोणतीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकू नयेत तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या या दक्षतेमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा...

वडगाव येथे उद्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर”; नागरिकांना १५ हून अधिक महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध वडगाव मावळ : महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

error: Content is protected !!