Homeशहरबैल पोळ्या निमित्त तळेगावची बाजारपेठ सजली

बैल पोळ्या निमित्त तळेगावची बाजारपेठ सजली

बैल पोळ्या निमित्त तळेगावची बाजारपेठ सजली

तळेगाव दाभाडे : मावळातील पारंपरिक आणि शेतकरी कुटुंबांच्या संस्कृतीशी नाळ जुळलेल्या बैलपोळा सणाच्या आगमनाने तळेगाव दाभाडे शहरातील बाजारपेठ रंगतदार व गजबजलेली दिसत आहे.

गावातील जिजामाता चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक तसेच स्टेशन परिसरातील सर्वच प्रमुख चौकांत शेकडो दुकाने थाटली असून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. बळीराजाने आपल्या बैलजोडीला सजवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे साज-श्रृंगार साहित्य, रंगीत झुल, कवड्या-घुंगरांच्या माळा, नवी वेसनं, बाशिंग, बेगड, नक्षीकाम केलेले कासरे व पारंपरिक सजावटीच्या वस्तूंची खरेदी सुरू आहे.

बैल सजावटीची धामधूम

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा व बैलांचा सण म्हणून ओळखला जातो. सकाळी लवकर उठून बैलांना आंघोळ घालून हळद-तेलाने मालिश केली जाते. त्यांच्या पाठीवर रंगीत गेरुने नक्षी काढली जाते. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा चढवल्या जातात. यानंतर सुग्रास जेवण व गोड पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो.

ज्या घरांमध्ये बैल नाहीत, तेथे मातीचे बैल विकत आणून त्यांची पूजा केली जाते. घरातील महिला भगिनी या सणाच्या निमित्ताने बैलांची आरती करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बैलांची सेवा करणाऱ्या बैलकऱ्यांनाही नवीन कपडे भेट म्हणून दिले जातात.

बाजारपेठेची उत्साहवर्द्धक झळाळी

तळेगाव दाभाडे व परिसरातील नागरिकांनी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळ्याच्या सणासाठी मोठ्या उत्साहात खरेदी सुरू केली आहे. पारंपरिक सजावटीच्या वस्तूंशिवाय घरगुती पूजेचे साहित्य, विविध खाद्यपदार्थ, गोडधोड विक्री करणाऱ्या दुकानांतही मोठी गर्दी आहे.

याचबरोबर, नवरात्र महोत्सवाची चाहूल लागल्याने घटस्थापनेसाठी लागणारे पूजन साहित्य, सुपारी, नारळ, अक्षता, अगरबत्ती, फुले, लहान देवीच्या मुर्ती व सजावटीच्या वस्तूंची विक्रीही जोरात सुरू आहे.

सणावाराची आनंदी वातावरणनिर्मिती

बैलपोळा आणि नवरात्र यांच्या आगमनाने तळेगाव शहर व परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारपेठेत दिवसभर उत्साह, गर्दी व रंगतदार दृश्ये दिसत आहेत. व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्याही चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!