मावळातील चार ग्रामपंचायतींना ८५ लाखांचा निधी आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
वडगाव मावळ, दि. १९ सप्टेंबर – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा अधिक सक्षम व नागरिकाभिमुख करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, एकूण ₹८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर झालेला निधी :
टाकवे खुर्द ग्रामपंचायत – ₹२० लाख
कुसगाव बु. ग्रामपंचायत – ₹२५ लाख
सांगिसे ग्रामपंचायत – ₹२० लाख
घोणशेत ग्रामपंचायत – ₹२० लाख
एकूण निधी : ₹८५ लाख
ग्रामपंचायतींना होणारा फायदा
या मंजुरीनंतर संबंधित ग्रामपंचायतींना आधुनिक, सुटसुटीत व नागरिकाभिमुख कार्यालयांची उभारणी करता येणार आहे. यामुळे ग्रामस्थांना अधिक सक्षम, पारदर्शक व दर्जेदार सेवा उपलब्ध होतील. ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक वेगवान व प्रभावी होईल, तसेच प्रशासनिक कामकाज सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
आमदार शेळके यांचा पाठपुरावा
गेल्या काही महिन्यांपासून या निधीसाठी आमदार श्री. सुनील शंकरराव शेळके यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार शेळके म्हणाले –
“ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे केंद्र आहे. सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या की ग्रामविकासाला गती मिळते. या निधीमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना वेळेवर सेवा मिळेल.”
ग्रामस्थांचा आनंद
या निर्णयाचे ग्रामस्थ व स्थानिक जनप्रतिनिधींनी स्वागत केले असून, “आमदार सुनील शेळके हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मावळ तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत,” अशा शब्दांत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.




















