Homeमहत्त्वाचेमाजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

देहुगाव : श्री क्षेत्र देहूगाव ते देहू फाटा-येलवाडी मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने नागरिक, वाहनचालक, शेतकरी, कामगार तसेच भाविक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. उन्हाळ्यात प्रचंड धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा त्रास होत असल्याने हा मार्ग वापरणे जिकिरीचे झाले आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी सरपंच नितीन गाडे (पाटील) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि स्थानिकांची व्यथा जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

भेगडे साहेबांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधत हा मार्ग तातडीने दुरुस्त व्हावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली. यावेळी त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेबाबत सविस्तर माहिती देऊन त्वरित कारवाईची विनंती केली.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रकरणी आवश्यक ती तातडीची कारवाई होईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले असून स्थानिक नागरिक व उपोषणकर्त्यांनी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!