Homeताज्या बातम्यामावळ तालुक्यात भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे स्पष्ट; मंगळवारी महायुतीचे उमेदवार अर्ज भरणार माजी मंत्री...

मावळ तालुक्यात भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे स्पष्ट; मंगळवारी महायुतीचे उमेदवार अर्ज भरणार माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिली माहिती 

मावळ तालुक्यात भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे स्पष्ट; मंगळवारी महायुतीचे उमेदवार अर्ज भरणार माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिली माहिती

मावळ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये मावळ तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणतीही युती नसल्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले. तसेच मंगळवार, दिनांक २० जानेवारी रोजी ते महायुतीच्या वतीने आपला उमेदवारांचा अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेत बोलताना बाळा भेगडे म्हणाले की, “मावळ तालुक्यात भाजप ही संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असून कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाणार आहे. जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण भाजप करत असून, महायुतीच्या माध्यमातून सक्षम व विकासाभिमुख उमेदवार मैदानात उतरवले जातील.”

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे, किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक चिराग खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले प्रशांत भागवत यांचाही या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला. इंदुरी–वराळे गटातून महायुतीच्या उमेदवार म्हणून मेघनाताई भागवत या निवडणूक रिंगणात असून, त्यांना महायुतीकडून पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती मजबूतपणे उतरली असून, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!