Homeताज्या बातम्यामावळात भात कापणीचा हंगाम जोमात; मजुरटंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल

मावळात भात कापणीचा हंगाम जोमात; मजुरटंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल

मावळात भात कापणीचा हंगाम जोमात; मजुरटंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल

मावळ तालुका :खरीप हंगामातील भात कापणी व झोडपणीचा हंगाम सध्या मावळात जोरदार गतीने सुरु असून गावागावांत शेतशिवारांत पुन्हा एकदा कापणीची लगबग दिसू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी कुटुंबांसह पुन्हा शेतमळ्यात धाव घेत आहेत. नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ तसेच तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळच्या पहाटेपासून भात कापणी व झोडपणीची कामे हाती घेतली असून शेतांमध्ये हार्वेस्टर आणि थ्रेशर मशीनचा आवाज घुमू लागला आहे.

यावर्षी मजुरांची तीव्र टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापणीसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढवला आहे. मजुरांचे दर दिवसेंदिवस वाढत असून सध्या ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मजुरी पोचल्याने शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संदर्भात बोलताना नाणे मावळ परिसरातील परिश्रमी महिला शेतकरी सौ. सुनंदा खांडभोर म्हणाल्या, “मजुरांचा तुटवडा खूप जाणवतो आहे. त्यामुळे कापणीसाठी यंत्रांची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र मजुरी आणि यंत्रसामग्रीचा वाढलेला खर्च पाहता शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येत आहे. तरीही मेहनत आणि विश्वास सोडता येत नाही, म्हणून आम्ही कुटुंबासह शेतात राबत आहोत.”

काही भागांत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाण्याखाली गेलेल्या भात रोपांमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुनंदा खांडभोर यांनी सांगितले की अनेक शेतांमध्ये उभे पीक पावसामुळे भिजून गेले किंवा आडवे पडले असून त्यामुळे दाणे भरता न आल्याने उत्पन्नात घट अपरिहार्य ठरण्याची भीती आहे.

दरम्यान, तालुक्यातील काही भागांत कापणीचा वेग वाढला असला तरी काही शेतांमध्ये अजूनही ओलावा असल्याने यंत्रे आतपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने हातानेच कापणी करावी लागत आहे. दिवसाचा खर्च, वाढते मजुरीदर आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितांवर परिणाम होत असला तरी हंगामाची वेळ निघून जाऊ नये म्हणून कापणीची कामे अखंड सुरू आहेत.

मावळ तालुक्यातील भात कापणी हंगामाला यंत्रसहाय्याची मोठी साथ मिळत असली तरी हवामानाने साथ दिल्यास आगामी काही दिवसांत कापणी व झोडपणीची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!