Homeआरोग्यलोणावळ्यातील चौधरी वडेवाले या खाद्यपदार्थाच्या दुकानात सडक्या व उंदरांनी कुडतडलेल्या बटाट्याचा वापर...

लोणावळ्यातील चौधरी वडेवाले या खाद्यपदार्थाच्या दुकानात सडक्या व उंदरांनी कुडतडलेल्या बटाट्याचा वापर करून बनवले जातात वडे

लोणावळा : शहर हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून देश-विदेशातून हजारो पर्यटक दररोज लोणावळ्यात येत असतात. याच लोणावळ्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यां कडील स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीतील गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. नागरिकांच्या आरोग्याची थेट खेळ होतोय. लोणावळा शहरातील चौधरी वडेवाले या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी खराब. कुजलेले व उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरून वडे तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका सजग नागरिकांमुळे उघडकीस आला आहे.

या सजग नागरिकांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली तक्रारीची त्वरित दखल घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पोलीस पोहोचेपर्यंत मुख्य आचारी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी कारवाईसाठी आवश्यक ती माहिती जमा केली असून अन्न व औषध प्रशासन( FDA) यांना या संदर्भात लवकरच कळवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दुकानात जे बटाटे उकडले जात होते ते अक्षरशः सडलेले व उंदरांनी कुडतडलेले होते तसेच या बटाट्यांना उकळण्यासाठी जे पाणी वापरण्यात येत होते ते पाणी देखील गढूळ व अस्वच्छ होते. अशा घाणेरड्या पद्धतीने बनवलेले वडे खाऊन कोणाला काही अपाय झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. शहरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाने अशा अन्न विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी आणि येथील खाद्यपदार्थाची तपासणी करावी अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!