Homeसामाजिकलोहगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल तळेगाव स्टेशन येथे शोभायात्रेचे आयोजन

लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल तळेगाव स्टेशन येथे शोभायात्रेचे आयोजन

लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल तळेगाव स्टेशन येथे शोभायात्रेचे आयोजन

तळेगाव दाभाडे : नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठा साम्राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर व लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.८ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

यामध्ये शिवाजी चौक ते फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग अभ्यासिका असे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभा यात्रेदरम्यान आनंदोत्सव साजरा करण्यासाठी साखर वाटप देखील करण्यात येणार आहे. नंतर जाहीर कार्यक्रमात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाला सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच, शिवव्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे व लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी केले.

मंचातर्फे लोहगडावर गेली २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदीराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार करण्यात आला. महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. भारतीय पुरातत्व विभागाकडे मंचातर्फे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गडाला नवीन गणेश दरवाजा बसविण्यात आला. गडाचे दरवाजे आता सायंकाळी ५ वाजता बंद केले जातात. त्यामुळे गडावर घडणारे गैरप्रकार बंद झाले.

मंचाने भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या इतर सुधारणांसाठी पाठपुरावा केला व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. मंच व ग्रामस्थांच्या वतीने लोहगड पायथ्याला शिवभक्तांसाठी प्रेरणादायी भव्य शिवस्मारक उभारणी देखील करण्यात आलेली आहे.

लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे अविरतपणे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे” या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू आहे. भविष्यात लोहगड पायथ्याला भव्य शिवसृष्टी उभारण्याचा मंचाचे ध्येय आहे. या कार्यामुळे लोहगड विसापूर विकास मंचाचा सत्कार या कार्यक्रमात ठेवला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!