Homeमहत्त्वाचेवडगाव शहरातील फलक सोशल मीडियामुळे झाला दुर्लक्षित

वडगाव शहरातील फलक सोशल मीडियामुळे झाला दुर्लक्षित

वडगाव, ता. मावळ : (संजय दंडेल)

ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थान परिसरातील महादेव मंदिराच्या संरक्षण भिंतीवर अनेक वर्षांपासून लावलेला ऐतिहासिक फलक आजकाल हळूहळू दुर्लक्षित होत चालला आहे. गावातील महत्त्वाच्या घटना, सभा, दुःखद प्रसंग किंवा उत्सवांची माहिती एकेकाळी या फलकावरून सर्व नागरिकांपर्यंत पोहोचायची. मात्र, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आता या परंपरेला ओहोटी लागली आहे.

पूर्वी वडगाव शहरात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा असतील, पोटोबा देवस्थानच्या मिटींग असतील, किंवा गावातील कोणाचे निधन झाले असेल तर त्याची नोंद या फलकावर लिहिली जायची. गावकरी रोज मंदिर परिसरातून जात असल्याने हा फलक ही महत्त्वाची माहिती मिळविण्याचे केंद्र ठरायचा. विशेषतः मोबाईल आणि इंटरनेट नसलेल्या काळात हा फलक म्हणजेच गावाच्या माहितीचा मुख्य आधार होता.

परंतु आजच्या काळात प्रत्येकजण WhatsApp, Facebook, Instagram, Telegram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बातम्या, सूचना व शोकवार्ता शेअर करतो. त्यामुळे या फलकाकडे आता कुणाचे लक्षच राहत नाही. परिणामी गावाच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा दुवा हरवू लागला आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे की, “आजच्या तरुण पिढीला या फलकाचे महत्त्व कळावे, ही माहितीची परंपरा जपली जावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण सोशल मीडियावर मेसेज येतात आणि जातात, पण हा फलक गावाच्या आठवणी कायम जपून ठेवतो.”

ग्रामस्थांनीही या फलकाचा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच फलकाचे नूतनीकरण करून महत्त्वाच्या सूचना आजही त्यावर लिहिल्या गेल्या तर पुढील पिढ्यांना गावच्या परंपरेची ओळख राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!