Homeक्राईमशिरगाव हद्दीमध्ये ५ वर्षीय मुलीचा अमानुष खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरगाव हद्दीमध्ये ५ वर्षीय मुलीचा अमानुष खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरगाव हद्दीमध्ये ५ वर्षीय मुलीचा अमानुष खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरगाव : मावळ तालुक्यातील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राहत्या घरापासून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय मुलीचा मृतदेह आज दुपारी आढळला. या मुलीला एका नराधमाने चॉकलेटचे अमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील मुलीचे आईवडील एका खेळणी बनविणाऱ्या कारखान्यात काम करतात. काल सायंकाळी ते कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या मुलीचा काहीही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला शोधायला सुरुवात केली. त्याचवेळी मुलीच्या गहिर्या शोधासाठी स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले.

रात्रभर शोध घेतल्यानंतर, रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांना मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाझुडपात सापडला. मृतदेहावरून झालेल्या तपासानुसार, मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचा खून करण्यात आलेला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

घटनेचा अधिक तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली, ज्यात ३० वर्षीय समीरकुमार मंडल( झारखंड) हा संशयित आरोपी पीडित मुलीला आपल्या सोबत घेऊन जातानाचे स्पष्टपणे दिसले. आरोपीने मुलीला चॉकलेटचे अमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचा खून करून मृतदेह झाडात टाकला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, शिरगाव पोलिस त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करत आहेत. आरोपीच्या ताब्यातून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेने शिरगाव परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांना आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक जागरूक होण्याची गरज आहे, असे अनेक ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!