Homeसामाजिकसुप्रसिद्ध कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून ‘श्री शिवशंभू तीर्थ’ शिल्पाचा लोगो समितीकडे...

सुप्रसिद्ध कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून ‘श्री शिवशंभू तीर्थ’ शिल्पाचा लोगो समितीकडे सुपूर्द

सुप्रसिद्ध कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून ‘श्री शिवशंभू तीर्थ’ शिल्पाचा लोगो समितीकडे सुपूर्द

तळेगाव दाभाडे:छत्रपती शिवशंभू स्मारक समितीच्या भव्य ‘श्री शिवशंभू तीर्थ’ या शिल्प प्रकल्पाचा लोगो सुप्रसिद्ध कॅलिग्राफर आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अच्युत पालव यांनी अत्यंत देखण्या, आकर्षक आणि भावनाप्रधान शैलीत साकारला आहे. त्यांच्या कलात्मक हस्तकौशल्यातून तयार झालेला हा लोगो शुक्रवार दि १७ ऑक्टोंबर रोजी समितीच्या प्रतिनिधींना औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला.

या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष संतोष वसंतराव भेगडे (पाटील), विनीत दत्तात्रय भेगडे, तसेच मयसभा स्टुडिओचे संचालक प्रसाद कुर्हे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात वातावरणात सन्मान, अभिमान आणि संस्कृतीचा संगम दिसून आला.

अच्युत पालव यांनी तयार केलेल्या या लोगोत छत्रपती शिवशंभूंच्या शौर्य, तेज, पराक्रम आणि आध्यात्मिकतेचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यांच्या कॅलिग्राफीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून मराठी संस्कृतीचे वैभव आणि छत्रपतींच्या अदम्य पराक्रमाची झलक प्रकट होते. लोगोमधील रेषांची प्रवाहीता, अक्षररचनेची ताकद आणि रंगसंगतीतील प्रभावी समतोल या माध्यमातून छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वातील तेजस्वीता व सामर्थ्य सुंदरपणे अधोरेखित केली आहे.

समितीच्या वतीने अच्युत पालव यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. समिती चे अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील)यांनी सांगितले की, “श्री शिवशंभू तीर्थ” या प्रकल्पाच्या वैभवात हा लोगो नवी उंची आणेल आणि जनमानसात छत्रपतींच्या आदर्शांचे पुनरूज्जीवन घडवेल.”

‘श्री शिवशंभू तीर्थ’ हा प्रकल्प तळेगाव दाभाडे येथे साकारला जात असून, तो महाराष्ट्रातील एक आदर्श सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळख निर्माण करणार आहे. या शिल्प प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवशंभूंच्या विचारांचे, आदर्शांचे आणि शौर्यपरंपरेचे स्मरण कायम ठेवणे.

या भव्य स्मारकाचे उद्घाटन सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, अयोध्या येथील प्रभू राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते श्री शिवशंभू तीर्थाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विविध मान्यवर, कलाकार, आणि इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी छत्रपतींच्या जीवनगौरवावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘श्री शिवशंभू तीर्थ’ या प्रकल्पाचा लोगो आता अधिकृतरीत्या सादर झाल्यामुळे, स्मारकाच्या निर्मितीला एक नवे कलात्मक आणि सांस्कृतिक परिमाण प्राप्त झाले आहे. या लोगोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आणि कलेच्या समृद्ध परंपरेची झलक प्रकट होत असून, तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!