Homeसामाजिक स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे १४ एप्रिलला आयोजन

 स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे १४ एप्रिलला आयोजन

 स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे १४ एप्रिलला आयोजन

वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी दिली. यावेळी सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे, कार्याध्यक्ष खंडुजी काकडे व कार्यक्रम प्रमुख संभाजी येळवंडे उपस्थित होते.

या उपक्रमाचे हे सलग १३ वे वर्ष असून, मंगळवारी पहाटे श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता साखरपुडा, दुपारी १२ ते ३ या वेळेत भोजन समारंभ, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी ३ ते ५ या वेळेत नवरदेवांची भव्य मिरवणूक आणि सायंकाळी ५.३० वाजता विवाह सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी हभप नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रय महाराज टेमगिरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, बाळासाहेब नेवाळे, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समिती सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, नगराध्यक्ष अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सोहळ्यानिमित्त येणाऱ्या हजारो वऱ्हाडींसाठी भव्य मंडप व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी, वधूसाठी चांदीचे अलंकार आणि मनगटी घड्याळ भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या भव्य सोहळ्याचे नियोजन प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुधीर ढोरे, कार्तिक यादव, अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, केदार बवरे यांच्यासह समितीच्या सदस्यांकडून करण्यात येत असून, लग्नापूर्वी होणारी नवरदेवांची मिरवणूक हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध   वडगाव मावळ : येथील स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या...

ओझर्डे येथे श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवात भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार

ओझर्डे येथे श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवात भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार वडगाव मावळ (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ओझर्डे गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व...

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट 

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट    वडगाव मावळ : वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या वडगाव फाटा परिसरात आता...

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते

तळेगाव दाभाडे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते   तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या वतीने यशवंत नगर परिसरात नव्याने उभारण्यात...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज उत्सवाला वडगाव मावळात भक्तिमय प्रारंभ; पालखी, कुस्त्या व बैलगाडा शर्यतींनी रंगली जत्रा   वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ...

error: Content is protected !!