Homeक्राईमअंडी विक्रीच्या आड अंमली पदार्थांची विक्री; लोणावळ्यात पोलिसांची धडक कारवाई दोन जणांना...

अंडी विक्रीच्या आड अंमली पदार्थांची विक्री; लोणावळ्यात पोलिसांची धडक कारवाई दोन जणांना अटक, एम.डी. पावडर जप्त

अंडी विक्रीच्या आड अंमली पदार्थांची विक्री; लोणावळ्यात पोलिसांची धडक कारवाई दोन जणांना अटक, एम.डी. पावडर जप्त

लोणावळा : लोणावळा शहरात पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत अंडी विक्रीच्या दुकानाच्या आडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांकडून मेफेड्रोन (एम.डी.) पावडर असा सुमारे ५ हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

ही कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता लोणावळ्यातील जी वॉर्ड, इराणी चाळ येथील ‘सितारा एजन्सी’ (अंडी विक्रीचे दुकान) येथे करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. दुकानात संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता अंडी विक्रीच्या आड अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड झाले.

या ठिकाणी पोलिसांनी ताबान जायर पठाण (वय २९, रा. जी वॉर्ड, इराणी चाळ, लोणावळा) याच्याकडून १ ग्रॅम ३३० मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम.डी.) पावडर, तर महीपाल साजनराम बिश्नोई (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा) याच्याकडून १ ग्रॅम ०३० मिलीग्रॅम एम.डी. पावडर असा मुद्देमाल जप्त केला.

प्राथमिक तपासात दोघांनीही हा अंमली पदार्थ विक्रीसाठी ठेवला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेला पदार्थ तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

या कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले, “अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर परिसरात गस्त आणि गुप्त तपास वाढविण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.”

हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोहवा संदीप मानकर, राहुल चोरगे, हनुमंत वाळुंज, पोकॉ भूषण कुवर आणि प्रतीक बनसोडे यांच्या पथकाने केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे लोणावळ्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत अशा प्रकारच्या कारवायांना आणखी गती देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!