Homeसामाजिकआई माऊली गोविंदा पथक चेंबूर येथील गोविंदा पथकाने फोडली वडगांव शहरातील मानाची...

आई माऊली गोविंदा पथक चेंबूर येथील गोविंदा पथकाने फोडली वडगांव शहरातील मानाची दहीहंडी  

आई माऊली गोविंदा पथक चेंबूर येथील गोविंदा पथकाने फोडली वडगांव शहरातील मानाची दहीहंडी 

वडगांव मावळ : वडगांव शहरात दहीहंडी उत्सव सुरुवात करणारी संघटना म्हणजे श्रीमंत महादजी शिंदे रिक्षा संघटना गेल्या 37 वर्षापासून आपली परंपरा जपत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब ढोरे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमयी वातावरणात पार पडला. दहीहंडी उत्सव साजरा करत असताना प्रथम वडगाव मधील श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सालाबाद प्रमाणे यंदाही दहीहंडीचे पूजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगाव शहर पोलीस अधीक्षक कुमार कदम, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील ढोरे, यंदाचे दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष रामभाऊ सुतार उद्योजक युवराज ढोरे, खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश विनोदे यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले.

वडगाव शहराचे पोलीस अधीक्षक कुमार कदम यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पंढरीनाथ ढोरे म्हणाले, मानाची पहिली श्रीमंत महादजी शिंदे संघटनेची दहीहंडी मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडत असते. तसेच संघटना फक्त दहीहंडी कार्यक्रमा पुरती मयदित न राहता वर्षभर विविध सामाजिक उपक्रमातून आपले कार्य सतत करत असते. श्रीमंत महादजी शिंदे रिक्षा व टेम्पो संघटनेचे असणारी ही मानाची पहिली दहीहंडी फोडल्या शिवाय वडगाव शहरात दुसरी कोणतीही दहीहंडी फोडली जात नाही.

दहीहंडी उत्सवास आलेल्या गोविंदा पथकांनी पाच ते सहा थर रचून आपली मानवंदना दिली. अखेर आई माऊली गोविंदा पथक चेंबूर येथील गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून यंदाचा मान पटकाविला. संघटनेचे संस्थापक बाळासाहेब ढोटे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब ढोरे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे वडगाव शहर पोलीस अधीक्षक कुमार कदम सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संघटनेचे तुळशीराम जांभूळकर, जितेंद्र तांबोळी, वसंत चव्हाण, रामभाऊ सुतार, संदीप पाटोळे, जयदीप दाभाडे, बाळासाहेब कुडे, ओंकार तुमकर, सुधीर तुमकर, सोपान करवंदे, प्रदीप पटेकर, दादा ढमाले, विलास मोरे तसेच संघटनेमधील सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!