Homeमहत्त्वाचेआर्यन दाभाडेची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आर्यन दाभाडेची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

तळेगाव दाभाडे : येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आर्यन विक्रम दाभाडे (इ. ८ वी) याने जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुलांच्या ७१ किलो वजनगटात आर्यनने उत्कृष्ट कुस्ती कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. दमदार चाली, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर आर्यनची निवड पुणे विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

आर्यनच्या या यशामागे क्रीडा शिक्षक हर्षल मुळे यांचे मार्गदर्शन आणि सततचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि पालकांचा पाठिंबा या सर्व घटकांमुळे आर्यनने हे यश मिळवले आहे.

शाळेचे संस्थापक गणेश किशनराव भेगडे, अध्यक्ष सुनील बबनराव भेगडे, सचिव दत्तात्रय पंढरीनाथ नाटक, मुख्याध्यापिका रंजिता थंपी तसेच शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांनी आर्यनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी आर्यनला राज्यस्तरीय स्पर्धेतही विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

( प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!