Homeसामाजिकइंदोरीत शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप; भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

इंदोरीत शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप; भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

इंदोरीत शेतकऱ्यांसाठी आशेचा दीप; भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

इंदोरी मावळ : आजच्या बदलत्या काळात शेतकरी अडचणींनी घेरलेला असताना, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे उपक्रमच खरी आशा निर्माण करतात. इंदोरी पंचायत समिती गणातील शेतकरी बांधवांसाठी असाच दिलासादायक आणि प्रेरणादायी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तसेच आमदार सुनील शेळके यांचे खंदे समर्थक सुनिलनाना भोंगाडे यांच्या पुढाकाराने साकारत आहे. शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता इंदोरी-मावळ येथील हनुमान मंदिराशेजारी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे मोफत वाटप. शेती करताना येणाऱ्या खर्चाचा बोजा कमी व्हावा, यासाठी फवारणी पंप (१०० नग), कोळपणी यंत्र (६ नग), १० लिटर क्षमतेचे दुध कॅन (१०० नग) तसेच PARAS आणि Force Quick कंपनीची दर्जेदार उत्पादने शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यासोबतच लकी ड्रॉ पद्धतीने विविध उपयुक्त साहित्यही मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शेतकरी बांधवांसाठी स्नेह-भोजनाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता आपुलकी, एकोपा आणि सन्मानाची भावना जपणारा ठरणार आहे. “शेतकरी सुखी तर गाव समृद्ध” या भावनेतूनच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सुनिलनाना भोंगाडे यांनी सांगितले.

या मेळाव्यासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सविता (७७५७८६०९९१) व मेघा (७८४१०८०९९१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुनिलनाना भोंगाडे मित्र परिवार मावळ आणि शिवशक्ती सेवा मंडळ, इंदोरी पंचायत समिती गण यांच्या सौजन्याने होणाऱ्या या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!