Homeमहत्त्वाचेमतमोजणीमुळे तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात बदल; रविवारऐवजी सोमवारी बाजार भरणार

मतमोजणीमुळे तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात बदल; रविवारऐवजी सोमवारी बाजार भरणार

मतमोजणीमुळे तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात बदल; रविवारऐवजी सोमवारी बाजार भरणार

तळेगाव दाभाडे शहरात दर आठवड्याला रविवारी भरणारा पारंपरिक आठवडे बाजार येत्या रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतमोजणीमुळे त्या दिवशी भरविण्यात येणार नाही. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुरळीत राहावी तसेच नागरिक, व्यापारी, व्यावसायिक व विक्रेत्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, रविवारऐवजी सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी आठवडे बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली आहे.

मतमोजणीच्या दिवशी शहरात सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असणार असल्याने बाजार भरल्यास गर्दी वाढून अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून आठवडे बाजाराच्या तारखेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगर परिषदेमार्फत सर्व नागरिक, व्यावसायिक, व्यापारी व विक्रेत्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सोमवार, दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजीच आठवडे बाजारात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यास मदत होणार असून, बाजाराशी संबंधित घटकांचीही गैरसोय टळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!