Homeराजकीयइंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ७ कोटी ६४ लक्ष कामाचे भूमिपूजन

इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ७ कोटी ६४ लक्ष कामाचे भूमिपूजन

इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ७ कोटी ६४ लक्ष कामाचे भूमिपूजन

सांगुर्डी, ११ मे – इंदोरी ते सांगुर्डी या मुख्य रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडले. मावळ व खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार शेळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे PMRDAच्या माध्यमातून ₹ ७.६४ कोटींचा निधी मंजूर होऊन कामाला गती मिळाली आहे.

हा रस्ता तयार झाल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सांगुर्डी व इंदोरी गावांमध्ये सुरक्षित, सुगम आणि सक्षम दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे.

कार्यक्रमात मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, PMRDA सदस्य वसंत भसे, उमेश बोडके, प्रकाश हगवणे, सरपंच संगीताताई भसे, सरपंच शशिकांत शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार शेळके यांनी या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

*शांताई रेसिडेन्सीमध्ये विकास कामांचे भूमिपूजन*

शांताई रेसिडेन्सी को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ता डांबरीकरण व सीमाभिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पार पडले. सोसायटीतील पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोष दाभाडे, सुरेश दाभाडे तसेच संजय बाविस्कर, राजश्री कुलकर्णी, सुधीर सपाटे यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शेळके यांनी आपल्या भाषणात, “मावळ परिसरात नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देत असून, सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच काम सुरू आहे,” असे सांगितले.

मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटत असलेल्या आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारामुळे दोन्ही कामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!