Homeसामाजिकइतिहास कधीच विसरू नका. इतिहासच आपणास पुढील वाटचालीस यशस्वी होण्यासाठी कायम प्रेरणा...

इतिहास कधीच विसरू नका. इतिहासच आपणास पुढील वाटचालीस यशस्वी होण्यासाठी कायम प्रेरणा देत राहतात. सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांचे प्रतिपादन

इतिहास कधीच विसरू नका. इतिहासच आपणास पुढील वाटचालीस यशस्वी होण्यासाठी कायम प्रेरणा देत राहतात. सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : शहरातील तळेगाव रीजन्सी अवेन्यू को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ६ जून २०२५ रोजी ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मावळचे सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांचे व्याख्यान यावेळी आयोजित केले होते.

यावेळी बोलताना विवेक गुरव म्हणाले की शिवरायांना जनतेचे स्वराज्य निर्माण करायचे होते. शिवकाळातील साधुसंतांची. शेतकऱ्यांची येथील गोरगरीब जनतेची इच्छा होती की शिवरायांनी राज्याभिषेक करावा मराठा राजा सिंहासनाधीश्वर व्हावा. हिंदू देखील या देशाचे राजे होऊ शकतात या विचाराची सुरुवात म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. मुघलांच्या दडपशाहीला उत्तर देणारे न्याय कुशल राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला ज्याने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली ही आमच्याकरता निश्चितच अभिमानाची व आनंद साजरी करण्याची गोष्ट आहे.

भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेने ईश्वराचा अंश मानले. हिंदूंचा रक्षण करता आहे त्यांचेही स्वतःचे स्वराज्य आहे. याची जाणीव सर्वांनाच करून देणे आवश्यक होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेणे स्वीकारले इतिहास कधीच विसरू नका इतिहासच आपणास पुढील वाटचालीसाठी यशस्वी होण्यासाठी कायम प्रेरणा देत राहतात.

शिवरायांच्या नेतृत्वात जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजांचे भव्य दिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरले हजारो अनाम मावळ्यांच्या बलिदानातून हिंदवी स्वराज्य साकारले आहे. महाराष्ट्राच्या मातीस स्वाभिमानाचा स्वराज्याचा वटवृक्ष उभा राहिला त्या वटवृक्षाला शिवछत्रपती नावाचं छत्र लाभलं तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय.

असे उस्फूर्त व्याख्यान विवेक गुरव यांनी दिले. त्यांच्या व्याख्यानाने सर्व उपस्थित नागरिक भारावून गेले सोसायटी मधील विजयालक्ष्मी पांडे हिने अफजल खान वध व जीवा महाला यांचे कर्तृत्व यावेळी नमूद केले. तसेच राजू कुहिले यांनी शिवराज्याभिषेक चालू असताना छत्रपतींच्या मनात आलेले रयतेची जबाबदारी यावर आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक निखिल भगत हे उपस्थित होते गौरी जाधव यांनी व उपस्थित विद्यार्थ्यांनी विश्वशांती प्रार्थना म्हणाली. उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने जय जयकार केला. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरी जाधव यांनी आभार मानले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!