Homeशहरकामशेत मधील नागरिक विविध समस्येने त्रस्त कामशेत: मावळ तालुक्यातील 

कामशेत मधील नागरिक विविध समस्येने त्रस्त कामशेत: मावळ तालुक्यातील 

कामशेत मधील नागरिक विविध समस्येने त्रस्त कामशेत: मावळ तालुक्यातील 

मोठी बाजारपेठ असणारे शहर म्हणून कामशेत ची ओळख आहे. कामशेत शहर हे झपाट्याने वाढत असले तरी देखील येथील नागरिकांना मात्र अनेक सुविधा मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून शहरात कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्यातच उभी करतात किंवा दुकानासमोरच वाहने लावून निघून जातात शहरातील रस्ता हा मुळातच अरुंद असून दुकानदारांनीही अतिक्रमण केल्याचे पाहिला मिळत आहे.

रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि पायी चालणारे नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. एवढ्या मोठ्या बाजारपेठेत नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असताना शहरात तीन ते चार सुलभ शौचालयाची गरज आहे. शहरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असतो परंतु या बाजारासाठी योग्य अशी जागा मिळत नसल्यामुळे अनेक व्यावसायिक रस्त्याच्या बाजूला बसूनच भाजी विक्री करतात. शहरात सर्व सुविधा युक्त भाजी मंडईची गरज आहे.

तसेच शहरात जरी कचरा संकलन होत असले तरी देखील तो कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला स्वतःची जागा मिळत नाही. अनेक जण जुना पुणे मुंबई महामार्ग लगतच कचरा टाकतात. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत असते सहारा कॉलनी सह अन्य कॉलनी मधील गटारांची साफसफाई केली जात नसल्याने तेथे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थी अक्षरशः या घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जात असतात. पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांना भेडसावत आहे अनेक भागात तर दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. इंद्रायणी नदी जवळ पाणी शुद्धीकरण प्रक्रिया असून देखील ती व्यवस्थित कार्यरत नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी समस्येने ग्रासले आहे.

जवळच इंद्रायणी नदी वाहत आहे नदीपात्रात कंपनीतील सांडपाणी कोणतेही प्रक्रिया न करता सोडण्यात येत असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. शहरातील वृद्धांना. लहान मुलांना व नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान नाही. तसेच तरुणांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. या विविध समस्यांच्या संदर्भात बोलताना युवराज शिंदे म्हणाले की अजून किती वर्ष कामशेत चे नागरिक या समस्येने त्रस्त राहणार आहेत. शासनाने या समस्या सोडवण्याकरता ग्रामपंचायतीला भरीव निधी द्यावा.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!