Homeमहत्त्वाचेजनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ

वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असलेल्या एका उपक्रमशील शिक्षिकेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज कान्हे फाटा येथे घडली. दीपाली सुजित तांबे (रा. मंचर) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या अहिरवडे येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे मंचर परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या आज सकाळी जनगणनेच्या शासकीय कामासाठी निघाल्या होत्या. कान्हे फाटा परिसरात त्यांचे वाहन आले असता भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेनंतर दीपाली तांबे गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दीपाली तांबे या यापूर्वी निगडे व नायगाव येथील प्राथमिक शाळांमध्येही कार्यरत होत्या. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून काम करणाऱ्या, विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे त्या विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांमध्ये लोकप्रिय होत्या.

जनगणनेसारख्या महत्त्वाच्या शासकीय जबाबदारीसाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मंचर परिसरात शोककळा पसरली असून अनेक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!