Homeमहत्त्वाचेतळेगावात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी दिल्ली पॅटर्न राबवा

तळेगावात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी दिल्ली पॅटर्न राबवा

तळेगावात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी दिल्ली पॅटर्न राबवा

तळेगाव दाभाडे : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीमध्ये दिलेल्या निर्णयाच्या धर्तीवर तळेगावात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळेगाव शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केला असून त्यानुसार नवी दिल्ली व एन सी आर( नॅशनल कॅपिटल रिजन) क्षेत्रामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या रॅबीज आणि कुत्र्यां चावण्याच्या घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करून तत्काळ उपायोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.(१) सर्व भटक्या कुत्र्यांना तत्काळ रस्त्यावरून हटवण्यात यावे.(२) संबंधित प्राधिकरणांनी ८ आठवड्याच्या आत आवश्यक डॉग शेल्टर्स (निवारे) उभारावेत. (३) पकडलेल्या कुत्र्यांची नोंद व्यवस्थित ठेवावी आणि एकही कुत्रा पुन्हा रस्त्यावर सोडू नये.(४) कुत्रा चावण्याच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हेल्पलाइन एका आठवड्यात सुरू करावी.(५)रॅबीज प्रतिबंधक लस उपलब्ध असलेल्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करावी.(६) भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या कामात अडथळा आणणाऱ्या( प्राणी प्रेमींचाही समावेश) न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्यात येईल.

या धर्तीवर तळेगाव दाभाडे.वडगाव.कामशेत. या ठिकाणी उपाय योजना कराव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. तळेगाव दाभाडे शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तसेच या भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.८ ऑगस्ट २०२५ रोजी वडगाव मावळ येथे केशवनगर भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली होती. या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळेगाव, वडगाव, कामशेत ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!