तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा ठप्प — मुख्य दाबनलिका तुटल्याने आज पाणीपुरवठा बंद
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे पंपिंग स्टेशन येथील एक्स्प्रेस फीडरचा विद्युत पुरवठा MSEB तर्फे वारंवार खंडित झाल्याने पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅकप्रेशर निर्माण झाले. या तीव्र दाबामुळे सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील २० इंची मुख्य दाबनलिकेचा मेन व्हॉल्व जागीच पूर्णपणे तुटला असून पाईपलाइनलाही गंभीर हानी पोहोचली आहे.


नगरपालिकेचे अभियंता अभिषेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम सुरू असून त्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे:


तुकाराम नगर
संपूर्ण कॉलनी परिसर
गाव भाग
स्टेशन परिसर
वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल दरम्यानचा परिसर


नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे, अशी विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















