Homeराजकीयपुणे जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्यातील पाच गटांचे आरक्षण जाहीर

पुणे जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्यातील पाच गटांचे आरक्षण जाहीर

टाकवे, इंदोरी, खडकाळे, कुरूळगाव, सोमाटणे गटांमध्ये बदलते राजकीय समीकरण

मावळ (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील पाच गटांचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीनंतर मावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

या आरक्षणामुळे मावळमधील राजकीय गणितांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही गटांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे, तर काही ठिकाणी पुरुषांसाठी राखीव जागा आल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण काही दिवसांपूर्वीच सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले होते. त्यामुळे गटांच्या आरक्षणाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज सोडत जाहीर होताच, मावळमधील अनेक उमेदवारांमध्ये “आपल्याला हवे तसे आरक्षण मिळाले” या आनंदाचे वातावरण दिसून आले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही पातळ्यांवर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या प्रचारयोजना, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू झाल्याचे समजते.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “या सोडतीनंतर मावळ तालुक्याचा राजकीय नकाशा काही अंशी बदलण्याची शक्यता आहे. काही गटांमध्ये नवे चेहरे पुढे येतील, तर काही ठिकाणी जुने बालेकिल्ले राखण्यासाठी प्रयत्न सुरू होतील.”

जाहीर झालेल्या पाच गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे –

टाकवे गट – अनुसूचित जमाती (पुरुष)

इंदोरी गट – सर्वसाधारण (महिला)

खडकाळे गट – सर्वसाधारण (महिला)

कुसगांव ब्रु गट – सर्वसाधारण (पुरुष)

सोमाटणे गट – सर्वसाधारण (महिला)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!