Homeआरोग्यभोईरे येथे डॉ. अशोक दाते यांच्या पुढाकारातून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर;...

भोईरे येथे डॉ. अशोक दाते यांच्या पुढाकारातून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भोईरे येथे डॉ. अशोक दाते यांच्या पुढाकारातून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टाकवे (मावळ): ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळावी, या सामाजिक जाणिवेतून भोईरे (कशाळ किवळे), ता. मावळ येथे मंगळवार (दि. २३) रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये एकूण १६८ रुग्णांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ७० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर १७ रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. या सर्व रुग्णांवर येत्या शुक्रवारी अत्याधुनिक बिनटाक्याच्या लेझर फेको पद्धतीने पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांच्या ये-जा करण्यासाठी वाहन व्यवस्था, शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे तसेच चष्मेही आयोजकांच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सामान्यतः अशा प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र या शिबिरामुळे गरजू रुग्णांना कोणताही आर्थिक भार न पडता उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचार टाळणाऱ्या अनेक रुग्णांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या शिबिरात डॉ. अशोक दाते यांनी स्वतः रुग्णांची तपासणी केली. त्यांच्यासह डॉ. सुधीर शिंदे, डॉ. मोहित जैन व डॉ. मानसी यांनी वैद्यकीय सेवा दिली. तसेच गणेश मालपोटे, विनायक काठे, सोनिया रघुवंशी व उज्वला जयकर यांनी सहाय्यक म्हणून मोलाचे योगदान दिले.

डॉ. अशोक दाते हे टाकवे-नाणे गटातील जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व शैक्षणिक पात्रतेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. “सेवा हाच खरा राजकारणाचा पाया आहे,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास सरपंच अतुल भोईरकर यांच्यासह भगवान जाधव, शांताबाई जगताप, मनीषा भोईरकर, रेखा भोईरकर, मीरा भोईरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. ग्रामीण आरोग्यसेवेसाठी हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!