Homeआरोग्यएका दिवसात ११ केंद्रांवर १८०९ विद्यार्थ्यांची तपासणी; गोल्डन रोटरीचा हिमोग्लोबिन प्रकल्प ठरला...

एका दिवसात ११ केंद्रांवर १८०९ विद्यार्थ्यांची तपासणी; गोल्डन रोटरीचा हिमोग्लोबिन प्रकल्प ठरला ऐतिहासिक

एका दिवसात ११ केंद्रांवर १८०९ विद्यार्थ्यांची तपासणी; गोल्डन रोटरीचा हिमोग्लोबिन प्रकल्प ठरला ऐतिहासिक

तळेगाव स्टेशन : गोल्डन रोटरीच्या नारीशक्तीच्या सक्षम नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला हिमोग्लोबिन तपासणी प्रकल्प हा सामाजिक आरोग्य क्षेत्रात नवा मानदंड निर्माण करणारा ठरला आहे. एका दिवसात तब्बल ११ ठिकाणी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत १८०९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. विशेषतः शालेय वयोगटातील मुलांमध्ये रक्ताल्पतेबाबत जनजागृती व वेळेवर निदान या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मुलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, गोल्डन रोटरीने उचललेले हे पाऊल समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे. हिमोग्लोबिन कमी असल्याने होणारे शारीरिक, मानसिक व शैक्षणिक परिणाम टाळण्यासाठी तपासणीसोबतच पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमात तळेगाव स्टेशन व परिसरातील विविध शाळा आणि संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री भैरवनाथ विद्या मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वराळे), नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र. २ व ६, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, वीर जिजामाता व सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा, थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र. १ व २, कलाश्रम कॅरिंग हॅन्ड्स (आंबी) आदी शाळांमध्ये तपासण्या पार पडल्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोल्डन रोटरीच्या सर्व सदस्यांसह नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर्स तसेच शाळा प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत ताये, सेक्रेटरी प्रदीप टेकवडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख दिपाली शिंदे व सहप्रकल्प प्रमुख दीक्षा वायकर यांनी संपूर्ण उपक्रमाचे प्रभावी नियोजन केले.

“आरोग्यदायी भविष्याकडे – सेवेतून समाजबांधिलकी” या ब्रीदवाक्याला साकार करत गोल्डन रोटरीने सामाजिक जबाबदारीची प्रचीती दिली आहे. अशीच सेवाभावी, समर्पित व यशस्वी वाटचाल पुढेही अखंड सुरू राहो, हीच सर्वांची सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!