Homeमनोरंजनमहाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडे शहराने वेगळा ठसा उमटवला आहे डॉ सदानंद...

महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडे शहराने वेगळा ठसा उमटवला आहे डॉ सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडे शहराने वेगळा ठसा उमटवला आहे. डॉ सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : ज्येष्ठ नाट्य अभिनेते.गायक मराठी रंगभूमीवरील प्रतिभाशाली कलावंत. सुरेशराव साखवळकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेने मुंबईत आयोजित केलेले कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले तसेच नृत्यांगना डॉ मीनल कुलकर्णी यांना बालरंग भूमीवरील योगदाना बद्दल गौरवण्यात आले.

त्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्यावतीने साखवळकर व डाॅ कुलकर्णी यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना डॉ सदानंद मोरे म्हणाले की महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासात तळेगाव दाभाडे शहराने वेगळा ठसा उमटवला आहे.

तळेगाव दाभाडे हे शहर कलाकारांची खाण असून या शहराने रंगभूमीला चांगले कलाकार दिले आहेत. सत्काराला उत्तर देताना साखवळकर म्हणाले की संगीत रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी सर्वीपतरी प्रयत्न करीत राहणार असून या पुरस्काराने आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. डाॅ मीनल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात तळेगावच्या कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल नाट्य परिषदेचे आभार मानले व आपला हा वैयक्तिक सन्मान नसून तळेगाव दाभाडे शहराचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष नरेश गाडेकर, कार्यकारी समिती सदस्य विजयकुमार साळुंखे, तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष डॉ अर्पणा महाजन, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत भिडे, डाॅ वर्षा वाढोकर, विलास काळोखे, भगवान शिंदे, राजीव कुमठेकर, तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, सचिव सोनबा गोपाळे (गुरुजी) सदस्य राजेंद्र जगताप, व पत्रकार गणेश भेगडे, पत्रकार रेखा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस अहमदाबाद विमान दुर्घटने मध्ये मृत्यू पावलेल्या देशवासीयांना तसेच कुंडमळा येथील दुर्घटनेत व केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जीव गमावलेल्या देश वासियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमानंतर स्थानिक कलाकारांच्या नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक शेखर व्यास. सुधीर राणे इनामदार. निशा अभ्यंकर. श्रुती आफळे. स्वरदा रामतीर्थकर. यांनी सुरेल नाट्य गायन केले. पंडित सुरेश साखवळकर यांनी अगा वैकुंठीच्या राया या भैरवीने नाट्य मैफिलीची सांगता केली. केदार कुलकर्णी. विनय कशेळकर (तबला) प्रिया करंदीकर(संवादिनी) टाळ संगत सुरेश कुलकर्णी यांनी वाद्याची साथ संगत केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळेगाव दाभाडे नाट्य परिषदेचे संजय वाडेकर, नितीन शहा. नयना डोळस, डाॅ मिलिंद निकम, राजेश बारणे, सुमेध सोनवणे, तानाजी मराठे, सुरेश दाभाडे, बाळासाहेब गायकवाड, विदुर महाजन, दिपाली पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मिलिंद निकम व राजेश बारणे यांनी केले तर आभार संजय वाडेकर यांनी मानले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!