महिलांच्या आत्मसन्मानाचा व आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा रूट सेट संस्थेने पूर्ण केला हे रूट सेट चे कार्य कौतुकास्पद आहे. नयना आभाळे यांचे प्रतिपादन
तळेगाव दाभाडे : रूट सेट संस्थेच्या वतीने आयोजित आरी व फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षण १३ दिवसीय बॅचचा निरोप समारंभ रूट सेट संस्थेत मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा नयना आभाळे, पुणे जिल्हा अध्यक्षा कामिनी कडू, परीक्षक महादेव कासवते, रूट सेट संस्थेचे संचालक राजकुमार बिराजदार व प्रशिक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या सौ नयना आभाळे यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना आभाळे म्हणाल्या की महिलांच्या आत्मसन्मानाचा व आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा रूट सेट संस्थेने पूर्ण केला.हे रूट सेट संस्थेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्राहक आणि गिऱ्हाईक यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे.
ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून महिलांनी देखील या क्षेत्रात सक्रिय व्हावे प्रशिक्षणार्थीनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही सौ नयना आभाळे यांनी दिली. रूडसेट संस्थेचे संचालक राजकुमार बिराजदार यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणार्थी महिलांनी सादर केलेल्या आकर्षक कलाकृती पाहून त्या महिलांच्या मेहनतीचे कौशल्याचे कौतुक केले. स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
रूटसेट संस्था भविष्यातही असे उपक्रमशील प्रशिक्षण राबवणार आहे. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या वस्तूंना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश बावचे. योगिता गरुड. रवी घोजगे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश निळकंठ यांनी केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















