Homeसामाजिकमांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

वडगाव(मावळ): वडगाव परिसरात एका घराबाहेर दिसून आलेल्या मांडूळ सापाचे वेळेत रेस्क्यू करून त्याला नवजीवन देण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि वनविभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली.

प्राप्त माहितीनुसार, वडगावजवळील एका घरासमोर साप वारंवार दिसून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत निखिल नवघणे यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या केतिका कसेतवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार वनविभागाच्या वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिटला माहिती देण्यात आली.

क्षणाचाही विलंब न करता पथक घटनास्थळी दाखल झाले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रौनक खरे, जिगर सोलंकी तसेच वडगावचे वनरक्षक पी. कासोळे यांनी संयुक्तपणे त्या सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले. या वेळी उपस्थित नागरिकांमध्ये सर्पांविषयी जनजागृतीही करण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, वनपाल हिरेमठ यांच्या सहकार्याने आणि संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापाची तपासणी करण्यात आली. कोणतीही दुखापत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मांडूळ (Red Sand Boa) हा साप निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, सध्या तो अंधश्रद्धा आणि मानवी लोभामुळे संकटात सापडला आहे. दोन तोंडे असणे, गुप्तधन मिळवून देणे अशा अफवा पूर्णतः निराधार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. हा साप बिनविषारी आणि शांत स्वभावाचा असून, उंदरांवर उपजीविका करत असल्याने तो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडूळ हा अनुसूची-१ मधील संरक्षित प्रजाती असून, त्याची तस्करी किंवा बेकायदेशीररीत्या जवळ ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.

दरम्यान, कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास तात्काळ वनविभाग (१९२६) किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक निलेश गराडे (९८२२५५५००४)आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   वडगाव मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस अवस्थेत...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध   वडगाव मावळ : येथील स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या...

 स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे १४ एप्रिलला आयोजन

 स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचे १४ एप्रिलला आयोजन   वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मंगळवार,...

ओझर्डे येथे श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवात भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार

ओझर्डे येथे श्री काळभैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता उत्सवात भक्तिरसाचा उत्स्फूर्त आविष्कार वडगाव मावळ (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ओझर्डे गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व...

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट 

वडगाव फाट्यावर तातडीने सिग्नल सुरू करा; वाहतुकीवर निर्बंधांची शिवसेनेची मागणी १५ दिवसांचा अल्टीमेट    वडगाव मावळ : वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या वडगाव फाटा परिसरात आता...

error: Content is protected !!