
मावळातील अवैध उत्खनन प्रकरणी मोठी धडक कारवाई; तहसीलदार विक्रम देशमुख यांसह ३ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी व २ तलाठी निलंबित
मावळ : मावळ तालुक्यातील मंगरुळ परिसरातील अवैध उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने धडक कारवाई करत मोठे पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर ९० हजार ब्रास इतक्या प्रचंड अवैध उत्खनन प्रकरणी चौकशी तीव्र करण्यात आली होती. त्यानंतर विभागातील तीन माजी तहसीलदारांसह तब्बल दहा अधिकारी–कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.


निलंबित तहसीलदारांमध्ये जोगेंद्र कटियार, रणजीत देसाई, मधुसूदन बर्गे यांचा समावेश असून, सध्याचे मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनाही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मंडल अधिकारी संदीप बोरकर, अजय सोनवणे, माणिक साबळे आणि रमेश कदम यांनाही कारवाईला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय तलाठी दिपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.


मंगरुळ परिसरातील मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवैध उत्खननाला कोणाचा पाठिंबा किंवा दुर्लक्ष होते का, याचा तपास सुरू आहे. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आगामी चौकशीत आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















