Homeक्राईममावळात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा घाव; गोडुंब्रे फाट्यावर गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

मावळात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा घाव; गोडुंब्रे फाट्यावर गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

मावळात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा घाव; गोडुंब्रे फाट्यावर गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

शिरगाव : मावळ तालुक्यातील गोडुंब्रे फाटा परिसरात शिरगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका तरुणाकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या या तरुणास अटक करण्यात आली असून, मावळ परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) शिरगाव ते कासारसाई रस्त्यावर गस्त सुरू असताना गोडुंब्रे फाटा येथे संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यावेळी पोलीस शिपाई सागर बाळासाहेब जैनक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचत संबंधित तरुणास ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले.

पोलिस तपासात आरोपीचे नाव खंडू अशोक कालेकर (वय २८, रा. पवनानगर, काले कॉलनी, ता. मावळ, जि. पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल तसेच १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस (पितळी राऊंड) बेकायदेशीररित्या बाळगत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडील शस्त्र कुठून आणले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, तसेच त्यामागे कोणते गुन्हेगारी जाळे आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक पारखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मावळ परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!