Homeसामाजिकमावळातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा उत्सव : तळेगाव दाभाडेत ‘अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६’चे...

मावळातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा उत्सव : तळेगाव दाभाडेत ‘अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६’चे भव्य आयोजन

मावळातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा उत्सव : तळेगाव दाभाडेत ‘अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६’चे भव्य आयोजन

तळेगाव दाभाडे : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, संशोधन वृत्तीला चालना मिळावी आणि नवकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व रोट्रॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६’ या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुशीला मंगल कार्यालय, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन होत असून, यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपले वैज्ञानिक विचार, कल्पकता आणि संशोधन कौशल्य सादर करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात मावळ परिसरातील ५० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेले १०० पेक्षा अधिक विज्ञान प्रकल्प नागरिकांसाठी खुले असणार आहेत.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पर्यावरण संरक्षण, पाणी व ऊर्जा बचत, आरोग्य व स्वच्छता, स्मार्ट तंत्रज्ञान, शेतीविषयक उपाययोजना, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित असतील. या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, प्रयोगशीलता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता दिसून येणार आहे.

या विज्ञान प्रदर्शनास डॉ. चिराग मधुसूदन खळदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन होणार असल्याने या उपक्रमाचे शैक्षणिक महत्त्व अधिक वाढणार आहे.

तळेगाव दाभाडे व परिसरातील नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रकल्प पाहून त्यांचे कौतुक करावे व त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख रो. दीक्षा वायकर तसेच सहप्रकल्प प्रमुख रो. दिपाली शिंदे यांनी केले आहे.

‘अविष्कार मावळ विज्ञान प्रदर्शन २०२६’ हे केवळ एक प्रदर्शन न राहता, भविष्यातील शास्त्रज्ञ, अभियंते व संशोधक घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!