Homeमहत्त्वाचेरेल्वे गेट तीन दिवस बंद; भुयारी मार्ग खुला केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा

रेल्वे गेट तीन दिवस बंद; भुयारी मार्ग खुला केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा

रेल्वे गेट तीन दिवस बंद; भुयारी मार्ग खुला केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा

वडगांव मावळ (ता.१८) — केशवनगर रेल्वे गेट काही तांत्रिक व देखभाल कामामुळे सलग तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केशवनगर व सांगवी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असतानाच, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे व नगरसेवक गटनेते दिनेश ढोरे, विक्की भोसले यांच्या पुढाकाराने श्री शितळादेवी मंदिराजवळील भुयारी मार्ग दुचाकी वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. रेल्वे विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. तसेच नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी जागेवर जाऊन पाहाणी केली

रेल्वे गेट बंद असल्याने कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या वळसा मार्गाने प्रवास करावा लागत होता. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे अडथळ्यात अडकलेला भुयारी मार्ग अवघ्या तासाभरात खुला करण्यात आल्याने नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला आहे.

या मार्गासाठी केशवनगर भागातील रहिवासी सुमित कदम यांनीही प्रत्यक्ष सहकार्य केले. स्थानिकांच्या मागणीला प्रतिसाद देत लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने समन्वयातून तत्काळ निर्णय घेतल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आहे.

भुयारी मार्ग खुला झाल्याने केशवनगर–सांगवीदरम्यान दुचाकी वाहनांचा प्रवास सुलभ झाला असून वेळेची बचत होत आहे. रेल्वे गेट बंद असतानाच्या काळात हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाचे तसेच नगरपंचायतीचे आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!