Homeराजकीयइंदुरी–वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कातालुका उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांचा पदाचा राजीनामा

इंदुरी–वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कातालुका उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांचा पदाचा राजीनामा

इंदुरी–वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का बसला असून पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत भागवत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदुरी–वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू होत्या. या गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा सुटल्याने प्रशांत भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांत भागवत यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र पक्षाने मेघाताई भागवत यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

प्रशांत भागवत हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी आणि विविध सामाजिक-राजकीय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर इंदुरी–वराळे गटातील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली असून आगामी निवडणुकीत याचा परिणाम होण्याची चर्चा सुरू आहे. प्रशांत भागवत यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!