
लोणावळा नगरपरिषदेच्या रणधुमाळीसाठी भाजप सज्ज! संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
लोणावळा : आगामी लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली असून, संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणरायाचे आशीर्वाद घेऊन पहिली ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
विकासाभिमुख आणि समाजाभिमुख अशी ओळख असलेल्या या उमेदवारांच्या घोषणेमुळे लोणावळा शहराच्या राजकारणात भाजपाने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. शहराच्या विकासाची नवी दिशा ठरविण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी भाजपाने या निवडणुकीला ‘विकासाचा संकल्प’ म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


> “लोणावळा शहरामध्ये केवळ भाजपाकडेच २७ प्रभागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार आहेत. पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे केली जाईल,” असे भेगडे यांनी स्पष्ट केले.
लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा बिगुल वाजला असून, सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.


भाजपाने लोणावळा शहरात गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध विकासकामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
विकासाची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या निकषांवर उमेदवारांची निवड करण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. महायुतीतील घटक पक्षांनाही सोबत घेत भाजप ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली.
भाजपाचे घोषित झालेले ११ उमेदवार
प्रभाग क्रमांक उमेदवारांचे नाव
01 सुधीर गणपत पारिटे, शुभांगी सचिन गोसावी
05 सुभाष सुमंत डेनकर, ब्रिंदा अनिश गणात्रा
06 दत्तात्रेय रामचंद्र येवले, रेश्मा अर्जुन पठारे
07 देविदास भाऊसाहेब कडू, सुरेखाताई नंदकुमार जाधव
11 रचना विजय सिनकर
12 अभय अशोक पारख, विजयाताई नारायण वाळंज


या पत्रकार परिषदेला लोणावळा-नानेमावळ भाजपा अध्यक्ष अनिल गायकवाड, कोर कमिटी सदस्य रामविलास खंडेलवाल, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजाभाऊ खळदकर, विजय (पोपट) मोरे, अरविंद कुलकर्णी, संतोष गुप्ता, महिला अध्यक्ष परिचय भिलारे, बाळासाहेब जाधव, अरुण लाड, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, पार्वतीभाभी रावळ, सुरेश गायकवाड, मांगीलाल जैन आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटकांसाठी सुविधा, वाहतूक नियोजन, जलव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, तसेच नागरिकांसाठी सुरक्षित आणि आधुनिक शहर निर्मिती हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे भेगडे यांनी नमूद केले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















