वडगाव नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष, महिला सर्वसाधारण किंवा ओबीसी पुरुष आरक्षण लागल्यास कोणाची लॉटरी लागणार?
वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. नगराध्यक्षपदावर कोणत्या वर्गाचे आरक्षण लागते यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी जर सर्वसाधारण महिला आरक्षण लागले, तर अनेक इच्छुक महिला नेत्यांनी आपले दावे आधीच मजबूत केले आहेत. त्यात –अबोली मयूर ढोरे, सुनिता दत्तात्रय कुडे, वैशाली पंढरीनाथ ढोरे, सायली रुपेश म्हाळसकर
यावेळी विशेष म्हणजे महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने “वेट अँड वाॅच”ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देते याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
जर ओबीसी पुरुष आरक्षण लागले, तर अनेक दमदार उमेदवार मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. त्यात –मयूर ढोरे, पंढरीनाथ ढोरे, सुनील ग. ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, अनंता कुडे या नावांची चर्चा जोमात असून स्थानिक गटबाजीचे समीकरणही रंगू लागले आहे.
६ ऑक्टोबरच्या सोडतीनंतर नगराध्यक्षपद कोणत्या वर्गासाठी खुले राहते यावर सर्वच पक्षांची रणनीती ठरणार आहे.
भाजप सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत असला तरी आरक्षणानंतर त्यांच्या हालचाली निर्णायक ठरू शकतात.
महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) एकत्र लढणार की स्वतंत्र? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र जर महायुती एकत्रपणे लढली, तर वडगावमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा तीव्र असून गट-तटबाजी अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे.
वडगाव नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकारणाला नवा कलाटणी मिळणार यात शंका नाही.




















