वडगाव मध्ये गोकुळाष्टमी अखंड हरीनाम सप्ताहाची उत्सहात सांगता
वडगाव मावळ :- तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान, यांचे वतीने गोकुळाष्टमी सप्ताह मध्ये अखंड वीणा धारण, नवनाथ ग्रंथ पारायण, रोज भजन असे अनेक भक्तीमय कार्यक्रम होऊन या उत्सवाची सांगता हभप सागर महाराज पडवळ यांचे कीर्तना ने झाली.
नवनाथ ग्रंथ पारायण चे वाचन हभप गणेश महाराज लष्करी यांनी केले, गोपाळकाला दहीहंडी चा उत्सव सर्व भजनी मंडळ चे वतीने श्री दत्तमंदिर मध्ये संप्पन झाला. यावेळी काल्याचे महाप्रसादाचे आयोजन वडगाव सोसायटी चे माजी चेअरमन बाळासाहेब दामूशेठ म्हाळसकर यांचे परीवाराच्या वतीने करण्यात आले होते.
संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अशोकराव ढमाले, तुकाराम काटे अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनिता कुडे, पुजारी अशोक गुरव व ग्रामस्थ यांनी केले.




















