वडगाव मध्ये रविवारी दिंड्यांचा सन्मान व श्री पोटोबा देवस्थान चा अहवाल प्रकाशन सोहळा
वडगाव मावळ :- अखिल भारतीय वारकरी मंडळ, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान व विठ्ठल परिवार मावळ यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 15 जुन रोजी सकाळी 10 वाजता श्री पोटोबा मंदिर मध्ये पंढरपुर ला पायी जाणाऱ्या दिंडीतील तुळसीधारक महिला भगिनी यांना साडी चोळी, सन्मानचिन्ह व विनेकरी यांना पोशाख व प्रत्येक दिंडीला विना आणि श्री पोटोबा देवस्थान संस्थान चा पंधरावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी,संसदरत्न खासदार श्रीरंगआप्पा बारणे,आमदार सुनिल शेळके, मा राज्यमंत्री बाळा भेगडे, अखिल भारतीय वारकरी मंडळ चे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले, मंगल महाराज जगताप, नितीन महाराज काकडे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे, तुषार महाराज दळवी, ह भ प नंदकुमार भसे, आदिसह तालुक्यातील वारकरी मोठया संख्येने उपस्थिती राहणार आहे.
अशी माहिती वारकरी मंडळ अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे, पाटील, श्री पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विठ्ठल परिवार अध्यक्ष गणेश महाराज जांभळे यांनी दिली




















