Homeआरोग्यअटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून आर के लुंकड डायलिसिस...

अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून आर के लुंकड डायलिसिस सेंटर चा उद्घाटन समारंभ

अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून आर के लुंकड डायलिसिस सेंटर चा उद्घाटन समारंभ

वडगाव मावळ : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मावळ विचार मंच यांच्या माध्यमातून अटल आरोग्य अभियानांतर्गत आर के लुंकड यांच्या सहयोगातून आर के लुंकड डायलिसिस सेंटरचे रविवार दि.१५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. आर के लुंकड उद्योगसमूहाचे चेअरमन रमणलाल लुंकड यांच्या सहयोगातून विघ्नहर्ता हॉस्पिटल वडगाव येथे ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

वडगाव शहरातील डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरापासून दूर जावे लागते,अधिक पैसे खर्च होतात.रुग्णासह सोबत असलेल्या नातेवाईकांच्या वेळेचा अपव्यय होतो. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन मावळ विचार मंच संस्थेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आर के लुंकड उद्योगसमूहाच्या सहयोगातून MJPJAY आणि PMJAY अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रविवार दि.१५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता वडगाव मधील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे या सुविधेचा उद्घाटन समारंभ होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक रमणलाल लुंकड यांचे हस्ते, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

याप्रसंगी रविंद्र लुंकड, प्रा.किरण बोरा, संदीप भंडारी, मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, मा.नगरसेवक आनंद छाजेड, सुनिल देसरडा, विजय मरलेचा, सुभाषचंद्र मुथा, शिवाजी पालवे, पद्मराज जाधवर, निलेश जाधवर, मोतीराम जाधवर, ज्ञानदेव पाटील, दिलीप उकिरडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

अशी माहीती मावळ विचार मंच कार्यकारिणी चे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली. मावळ विचार मंच संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मा.नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून सुरू होत असणाऱ्या या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून कार्याध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, सचिव डॉ.सुनील बाफना,  ॲड. विजयराव जाधव, मा.नगरसेवक किरण म्हाळसकर, मा.नगरसेवक शंकर भोंडवे, सुरेंद्र एस. बाफना, कल्पेश भोंडवे, अतुल राऊत, गिरीश गुजराणी हे काम पाहणार आहेत.

विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक गोरख जाधवर, डॉ.विकास जाधवर, डॉ. स्मिता जाधवर तसेच मावळ विचार मंचाचे कार्याध्यक्ष पूजाताई पिंगळे, कार्यक्रम प्रमुख भक्तीताई जाधव, उपाध्यक्ष संतोष भालेराव, सचिव अमोल ठोंबरे, खजिनदार मकरंद बवरे, अशोक चव्हाण, नेमीचंद गुजराणी, दादा शिरोडकर, राजेंद्र लचके, बाळासाहेब बोरावके, जयवंत दुगम आदी सदस्यांनी नियोजन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!