Homeसामाजिकवडगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वडगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वडगाव, ता. मावळ :

शहरामध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत जाणारी लहान मुले, सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी नगरपंचायतीचे लक्ष वेधले आहे. “जर भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला, तर त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च नगरपंचायतीने करावा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

ढोरे यांनी पुढे सांगितले की, “नगरपंचायत प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवाव्यात. नसबंदी मोहीम, जनावरांसाठी आश्रयस्थळांची सोय, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके तयार करणे आवश्यक आहे. उशीर न करता जर या प्रश्नावर तोडगा काढला नाही, तर नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.”

सध्या शहरात अनेक भागांत भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसतात. रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांचा पाठलाग करण्याचे प्रकार घडत असून अपघाताचीही शक्यता वाढली आहे.

या समस्येवर नगरपंचायतीने तातडीने ठोस पावले उचलून शहरात भीतीऐवजी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!