१७ जुन २०२५ पासून वडगाव नगर पंचायतची प्रभाग रचना प्रक्रिया सुरू होणार
वडगाव मावळ : तालुक्यातील वडगाव नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. येत्या १७जून २०२५ पासून प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती वडगाव नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगरपंचायत एक सदस्य प्रभाग रचना करण्यात येणार आहे.१७ प्रभागासाठी १७ सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी मात्र थेट जनतेमधून निवड होणार आहे. प्रस्तावित प्रभाग रचना व आरक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जुलै २०२३ मध्येच वडगाव नगर पंचायतीची मुदत संपली होती. मात्र विविध कारणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्याने राजकीय वातावरण तापली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी होणाऱ्या वडगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये नगरसेवक होण्यासाठी अनेक तरुणांनी कंबर कसली आहे.
राज्य शासनाने मंगळवारी नगरपंचायत यांना प्रभाग रचनेसाठी जनगणना निकष निश्चित करून आदेश दिले. त्यानंतर वडगाव नगर पंचायत सज्ज झाली असून बैठकीद्वारे निवडणूक प्रक्रियेची आखणी सुरू झाली आहे. प्रभाग रचना प्रक्रियेचा कालावधी पुढीलप्रमाणे=११ते१६जुन प्रगणक गटाची आखणी व प्रारूप प्रभाग रचना तयार करणे.१७ ते १८जून. जनगणनेच्या माहितीची पडताळणी.१९ते २३जुन. संबंधित क्षेत्राची स्थळ पाहणी. २३ते २४जुन. गुगल मॅप वर प्रभाग नकाशे तयार करणे.१ ते ३ जुलै. नकाशावर निश्चित केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करणे.४ ते ७ जुलै. मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी या मसुदाला मंजुरी देतील. प्रारूप रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सुनावणी होऊन त्यानुसार अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. व ती निवडणूक आयोगाकडे पाठविली जाईल.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















