Homeमहत्त्वाचेअल्पवयीन मुलींवरील अत्याचारांवर कठोर कारवाईची अखंड मराठा समाजाची मागणी

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांवर कठोर कारवाईची अखंड मराठा समाजाची मागणी

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांवर कठोर कारवाईची अखंड मराठा समाजाची मागणी

वडगाव (मावळ) : मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत चिंताजनक वाढ होत असून, या अमानवी गुन्ह्यांवर शासनाने कठोरात कठोर भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी अखंड मराठा समाज, मावळ यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली. सातत्याने घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नुकतीच शिरगाव–परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. यापूर्वी कोथुर्ण गावातही अशाच स्वरूपाची धक्कादायक घटना घडली होती. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील माळेगाव परिसरात तसेच अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अखंड मराठा समाजाने तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्सबार आणि अंमली पदार्थांच्या खुलेआम विक्रीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने बंदी घातली असतानाही काही ठिकाणी डान्सबार सुरू असून, गांजा व इतर अंमली पदार्थांची सर्रास तस्करी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माध्यमांमध्ये याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सदर निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून कायद्यात आवश्यक ते कठोर बदल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अल्पवयीनांवरील अत्याचार करणाऱ्या आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवून तीन ते चार महिन्यांच्या आत निकाल देत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावावी, अशी ठाम भूमिका अखंड मराठा समाजाने मांडली आहे. कठोर शिक्षा झाल्यासच अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

निवेदन सादर करताना नरेंद्र मुर्हे, दत्तात्रेय आरगडे, विकास घोटुले, तन्वी शेवकर, दिपाली तांबे, सायली बोत्रे, भाऊसाहेब ढोरे, गणेश भेगडे, सुनील वाजे, संदीप कल्हाटर, ह.भ.प. संतोष महाराज शेलार, भाऊसाहेब हुलावळे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!