Homeक्राईमलोणावळ्यातील औढै खुर्द येथे उत्पादन शुल्कची धडक कारवाई; ७०० लिटर गावठी दारूसह...

लोणावळ्यातील औढै खुर्द येथे उत्पादन शुल्कची धडक कारवाई; ७०० लिटर गावठी दारूसह चारचाकी जप्त, दोघांना अटक

लोनावळा:पुणे परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल ७०० लिटर गावठी दारू व एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५ लाख ७४ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत औढे खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररित्या गावठी दारूची वाहतूक व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ५ लाख रुपये) ताब्यात घेण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वारस स्वरूपाचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. हे प्रकरण बेवारस नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दारूमुळे परिसरात होणारी संभाव्य आरोग्यहानी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टळल्याचे प्रशासनाने सांगितले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे, उपअधिक्षक सुजित पाटील (तळेगाव दाभाडे) आणि निरीक्षक उत्तम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक ए. एस. तांदळे करत असून, पी. जी. रुईकर (दुय्यम निरीक्षक), रोहिदास गायकवाड व प्रदीप गवळी (जवान) यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

मावळ तालुक्यात बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!