Homeमहत्त्वाचेमावळमधील प्रस्तावित नगररचना योजना रद्द करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

मावळमधील प्रस्तावित नगररचना योजना रद्द करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

मावळमधील प्रस्तावित नगररचना योजना रद्द करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

मावळ तालुक्यातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशी तालुक्यातील नेरे या गावांतील प्रस्तावित नगररचना योजना तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना (शिंदे गट) चे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी मुंबईत शिंदे यांची भेट घेऊन या भागातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध त्यांच्यापर्यंत पोहोचविला. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना, अडचणी आणि योजनाविरोधातील कारणे यांचा सविस्तर ऊहापोह करणारे निवेदनही त्यांनी सादर केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) संबंधित गावांमध्ये नगररचना योजना प्रस्तावित करत नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र या प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

खासदार बारणे म्हणाले, “या नोटीसमुळे उच्च न्यायालयाने पीएमआरडीए विकास आराखड्याला दिलेल्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.”

खासदार बारणे यांनी २०१६ मध्ये माण–म्हाळुंगे परिसरात जाहीर झालेल्या पण आजपर्यंत अंमलात न आलेल्या नगररचना योजनेचा उल्लेख करत सांगितले की, “त्या योजनेवर आजपर्यंत एकही ठोस कृती झालेली नाही. केवळ कागदोपत्री प्रक्रिया सुरू ठेवून शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आला आहे.”

बारणे म्हणाले, “या नव्या योजनेत एफएसआयच्या लाभाचा फायदा मोठ्या बिल्डरांना मिळणार आहे. परंतु, छोट्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार आहे. मोबदला एफएसआयच्या स्वरूपात देणे ही बेकायदेशीर पद्धत असून, ती शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे.”

प्राधिकरणाकडे आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने योजना वर्षानुवर्षे रखडेल आणि शेतकऱ्यांना आपली जमीन वापरता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या योजनांमधील अनेक जमिनी वादग्रस्त असून न्यायालयीन स्थगिती आदेश लागू असल्याचे बारणे यांनी नमूद केले.

“ही योजना विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी राबवली जात आहे. ग्रामस्थांना ही योजना कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली की, मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व संबंधित गावांतील नगररचना योजना तत्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावेत.

या मागणीवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मोबाईल : ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!