Homeमहत्त्वाचेई-शिवनेरीचा ‘फास्टटॅग फेल’ — तळेगाव टोलनाक्यावर प्रवाशांची कोंडी, संतप्त प्रवाशांनी भरला टोल

ई-शिवनेरीचा ‘फास्टटॅग फेल’ — तळेगाव टोलनाक्यावर प्रवाशांची कोंडी, संतप्त प्रवाशांनी भरला टोल

ई-शिवनेरीचा ‘फास्टटॅग फेल’ — तळेगाव टोलनाक्यावर प्रवाशांची कोंडी, संतप्त प्रवाशांनी भरला टोल

उर्से: मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बुधवारी (दि. १७) रात्री एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ई-शिवनेरी बसचा फास्टटॅग रिचार्ज नसल्याने तळेगाव टोलनाक्यावर बस तब्बल तासभर थांबवून ठेवण्यात आली. या निष्काळजीपणाचा फटका थेट प्रवाशांना बसला असून, रात्रीच्या वेळी मानसिक त्रास, अस्वस्थता आणि संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.

मुंबईतील दादर येथून सायंकाळी पाच वाजता निघालेली ई-शिवनेरी बस (क्रमांक MH 12 VF 5207) ठाणे मार्गे पुण्याकडे रवाना झाली होती. सर्व प्रवासी वेळेत आणि सुरक्षित प्रवासाच्या अपेक्षेने बसमध्ये बसले होते. मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्यावर पोहोचताच धक्कादायक वास्तव समोर आले. बसच्या फास्टटॅग खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे निदर्शनास येताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल भरल्याशिवाय बस पुढे नेण्यास स्पष्ट नकार दिला.

बस बराच वेळ जागेवरच थांबल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. प्रवाशांनी चालकाकडे विचारणा केली असता चालकाने डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार फोन करूनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. जबाबदार यंत्रणांचा हा हलगर्जीपणा पाहून प्रवाशांचा संताप अनावर झाला.

अखेर प्रवाशांनीच पुढाकार घेत आपापसात वर्गणी गोळा केली आणि सुमारे ९०० रुपयांचा टोल भरला. प्रवाशांच्या पैशातून टोल भरल्यानंतरच रात्री साडेदहाच्या सुमारास बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. सार्वजनिक वाहतुकीचा असा दुर्दैवी अनुभव अनेक प्रवाशांसाठी धक्कादायक ठरला.

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे बसमध्ये सहा महिन्यांची गर्भवती महिला प्रवास करत होती. दीर्घकाळ बसमध्ये अडकून राहिल्याने तिला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. रात्रीच्या वेळी अशी अवस्था ओढवल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“आम्ही तिकीट काढून प्रवास करतो, मग बसचा फास्टटॅग रिचार्ज ठेवण्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला. डेपो व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन, जबाबदारीचा अभाव आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!